म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर
Admin

म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर

म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 15 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. गेल्या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाही नुसार 155 रहिवाशांनी स्वतःची निवार्‍याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित तसेच वित्तहानी टाळता येईल. इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे. मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे. असे म्हाडाकडून आवाहन केलं आहे.

म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या इमारतींची यादी पुढीलप्रमाणे

1) इमारत क्रमांक 4-4 ए,नवरोजी हिल रोड क्र. 1, जॉली चेंबर

2) इमारत क्रमांक 74 निझाम स्ट्रीट

3) इमारत क्रमांक 42, मस्जिद स्ट्रीट

4) इमारत क्रमांक 61-61ए , मस्जिद स्ट्रीट

5) इमारत क्रमांक 212 जे पांजरपोळ लेन

6)इमारत क्रमांक 173-175-179 व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी

7)इमारत क्रमांक 2-4-6 नानुभाई देसाई रोड, मुंबई

8) इमारत क्रमांक 1-23 नानुभाई देसाई रोड, मुंबई

9) इमारत क्रमांक 351 ए, जे एस एस रोड मुंबई

10)इमारत क्रमांक 387-391 बदामवाडी, व्ही .पी. रोड

11) इमारत क्रमांक 17 नारायण निवास , निकटवाडी

12) इमारत क्रमांक 31सी व 33ए ,आर रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग, गिरगावचौपाटी

13) इमारत क्रमांक 104-106 ,मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग , शिवदास चापसी मार्ग

14) इमारत क्रमांक 40 कामाठीपुरा 4 थी गल्ली

15) अंतिम भूखंड क्र. 721 व 724 टीपीएस - 3 विभाग, इमारत क्रमांक 40 बी व 428, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com