सामान्यांचे कर्जाचे हप्ते वाढणार; आरबीआयकडून रेपो व्याज दरात वाढ

सामान्यांचे कर्जाचे हप्ते वाढणार; आरबीआयकडून रेपो व्याज दरात वाढ

आरबीआयकडून रेपो व्याज दरात वाढ करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आरबीआयकडून रेपो व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. सामान्यांचे कर्जाचे हफ्ते आता वाढणार आहेत. आज आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत देसाई यांनी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले आहे.

रेपो दरात 0.35 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर रेपो दर आता 6.25 टक्के इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेची पतधोरणविषयक बैठक सोमवारपासून सुरू होती. आपण आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या अखेरीस आले आहोत. देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. जगातील भूराजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे

तसेच या वर्षासाठीदेखील महागाई दर नियंत्रणाचे उद्दिष्ट दूर आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण दिसून आली होती. आर्थिक वर्ष 2023 साठी महागाई दर 6.7 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज असल्याचे व भारताची अर्थव्यवस्था आताही या परिस्थितीत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार आहे. असे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com