लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल; निलेश लंके म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल; निलेश लंके म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश लंके म्हणाले की, आमच्या मतदारसंघातील बऱ्याच कार्यकर्त्यांनी फटाके पण वाजवले. काही ठिकाणी बॅनर पण लागले. धाकधूक कसली आम्ही ज्या ठिकाणी पाऊल टाकू तिथलं पाणीच काढत असतो.

यासोबतच ते म्हणाले की, उद्या म्हणजे या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची दिवाळी असणार. निवडणुकीमध्ये मी बऱ्याच ठिकाणी भाषणात बोललो. सत्तेचा भयानक गैरवापर केला. आज ना उद्या आमचं पण सरकार येणार आहे. असे निलेश लंके म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com