लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल; रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल; रविंद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रविंद्र धंगेकर म्हणाले की, लढणं हे आपल्या रक्तात आहे. लढण्याला माणसाला कायम जिंकण्याची आशा असते. जो लढतो तो जिंकतो.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी गेली 30 वर्ष निवडणूका लढतो आहे. ही मी निवडणूक लढली आणि जिंकणार आहे. उद्या पहिली फेरी चालू झाली आणि दुसऱ्या फेरीला माझा लीड तुम्हाला लगेच सांगेन. कारण ती वस्तुस्थिती राहिल. आता ज्यांनी ज्यांनी बॅनर लावलेत त्यांचे फोटो काढून ठेवा. त्याच बॅनरवर माझा फोटो दिसेल. असे रविंद्र धंगेकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com