Admin
बातम्या
लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधींना हक्कभंगाची नोटीस
अदाणी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता.
अदाणी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. याच प्रकरणी आता राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे.लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि वर्तणूक शाखेच्या उपसचिवानं राहुल गांधींना ईमेलवर नोटीस दिलं आहे. लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींना १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदींबद्दल चुकीचे, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडल्याचा दावा भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला होता.
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांच्या तक्रारीवरून लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना ही नोटीस पाठवली आहे.