Pune kidney racket case
Pune kidney racket case

Lokshahi Impact : रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेज ग्रांट यांची पुणे पोलिसांकडून चौकशी

काही महिन्यांपूर्वी रुबी हॉल क्लिनिकमधून किडनी तस्करीचं प्रकरण Lokशाही न्यूजने उघडकीस आणल होतं.
Published by :
Sudhir Kakde

पुणे : रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic) डॉ. परवेज ग्रांट यांची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी रुबी हॉल क्लिनिकमधून किडनी तस्करीचं प्रकरण Lokशाही न्यूजने उघडकीस आणल होतं. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रांट यांच्यासह काही डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी आता डॉ परवेझ ग्रांट यांची चौकशी केली आहे. कोल्हापूरच्या सारीका सुतार या महीलेला १५ लाखांचे अमिष दाखवत रुबी हॉलमध्ये किडनी तस्करी करण्यात आली होती.

Pune kidney racket case
दारु बंदी असलेल्या गुजरातेत गावठी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू

कोल्हापूरच्या सारिका सुतार या महिलेला आर्थिक परिस्थिती बिकट आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी अमित साळुंके आणि त्याची पत्नी सुजाता साळुंके या दोघांनी पिडित महिलेला 15 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. मात्र एक रूपयाचीही दमडी न देता सारिका सुतार यांची फसवणूक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच लोकशाही न्यूजने सर्वप्रथम रुबी हॉस्पिटलमधील (Ruby Hospital) किडनी रॅकेटचा (Kidney Racket case) पर्दाफाश केला होता.या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून पोलीस प्रशासनासह आरोग्य विभागाने बातमीची दखल घेत रूबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता 24 तासात उत्तर न दिल्यास रुबी हॉल वर होणार गुन्हा दाखल होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com