पंढरपुरात धक्कादायक प्रकार! विठ्ठल मंदिरात सजावट केलेली 1 टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब

पंढरपुरात धक्कादायक प्रकार! विठ्ठल मंदिरात सजावट केलेली 1 टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब

आमलिका एकादशी निमित्त आज श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या चौखांबी मध्ये १ टन द्राक्ष वापरून मनमोहक अशी आरास करण्यात आली होती.

पंढरपूर : आमलिका एकादशी निमित्त आज श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या चौखांबी मध्ये १ टन द्राक्ष वापरून मनमोहक अशी आरास करण्यात आली होती. काळ्या आणि हिरव्या द्राक्षामध्ये विठुरायाचे रूप अधिकच खुलले होते. ही द्राक्षे आज भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच धक्कादाकय प्रकार समोर आला आहे. केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.

पंढरपुरात धक्कादायक प्रकार! विठ्ठल मंदिरात सजावट केलेली 1 टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब
आमदार होताच रवींद्र धंगेकर गिरीश बापटांच्या भेटीला; प्रकृतीची केली विचारपूस

आमलिका एकादशीनिमित्त पुणे येथील भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तब्बल 1 टन द्राक्षांची सजावट केली होती. आज सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांचे दर्शन सुरू झाले आणि अर्ध्या तासात 1 टन द्राक्षंपैकी एकही मणी शिल्लक राहिला नव्हता. दर्शनाला आलेल्या भाविकांनी ही द्राक्षे खाल्ल्याचा दावा केला जात आहे. मात्र दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्षाचे घड कोणी पळवले याची चर्चा सुरू आहे.

द्राक्ष हा विषय साधा असला तरी मंदिरात ज्या पद्धतीने हा प्रकार घडला आहे याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. ज्या भाविकांनी ही द्राक्ष सजावटीसाठी दिले त्याच्याही भावना या प्रकाराने दुखावल्या असून या प्रकारात नेमके कोण आहे याचा शोध मंदिर प्रशासनाने तातडीने लावावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, अशी अपेक्षा विट्ठल भक्तांनी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com