Navi Mumbai
Navi MumbaiTeam Lokshahi

नवी मुंबईकरांना शिंदे सरकारचे गिफ्ट! शासकीय हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज उभारणार

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ; मंदा म्हात्रे यांचा पाठपुरावा
Published by :
shamal ghanekar

हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी आधीच नवी मुंबईकरांना राज्यसरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. नवी मुंबईत शासकीय हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज लवकरच उभारणार आहे. त्यासाठी भुखंडाचा 107 कोटींचा दर 50% कमी करण्यात आमदार मंदा म्हात्रे यांना यश आले आहे. त्यामुळे भूखंडाचा मार्ग मोकळा झाला असून पुढील 3 ते 4 वर्षात नवी मुंबईकराना हक्काचे सरकारी रुग्णालय उपलब्ध होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर नवी मुंबईकरांसाठी पहिला महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी मंदा म्हात्रे यांनी अथक प्रयत्न आणि पाठपुरावा करत 107 कोटींचा भूखंड आता 60 कोटी रुपयांना मिळणार आहे. यामुळे महापालिकेचे सुमारे ४७ कोटी रुपये वाचणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

कोरोना काळानंतर नवी मुंबईत शासकीय रुग्णालयाची कमी उघडपणे जाणवली होती. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या दर्जाचे महापालिकेचे देखील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय असावे यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी सिडकोकडून भूखंडदेखील मंजूर करून घेतला होता; परंतु सिडकोने भूखंडाचे १०७ कोटी रुपये महापालिकेकडे मागितले होते; मात्र या दरात कपात करून शासकीय दराने भूखंड महापालिकेला द्यावा, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. त्याला अनुसरून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली मागणी मान्य केल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Navi Mumbai
Smart Village Of Navi Mumbai : सायबर सिटीतील पहिले स्मार्ट व्हिलेज 'दिवाळे'

लवकरच येत्या तीन ते चार वर्षांत त्याठिकाणी सुसज्ज रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. हे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तेथील डॉक्टर पालिकेच्या रुग्णालयांना सेवा देऊ शकणार आहेत. यामुळे महाविद्यालयाचा नवी मुंबई शहराला मोठा लाभ होणार असल्याचे त्या म्हणाल्या. ही जागा स्वस्तात मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी, सिडकोचे व्यवस्थापकिय संचालक, संजय मुखर्जी, आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले. याप्रसंगी नीलेश म्हात्रे, संपत शेवाळे, राजेश पाटील, विजय घाटे, विकास सोरटे आदी उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com