धक्कादायक! झोक्याने घेतला 9 वर्षीय चिमुरडीचा बळी

धक्कादायक! झोक्याने घेतला 9 वर्षीय चिमुरडीचा बळी

खटाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर

प्रशांत जगताप | सातारा : खटाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तडवळे येथे लोखंडी पाईपला साडी बांधून झोका खेळत असताना त्यामध्ये मान अडकल्याने 9 वर्षाच्या चिमुकलीचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. पौर्णिमा शंकर फाळके असे या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

धक्कादायक! झोक्याने घेतला 9 वर्षीय चिमुरडीचा बळी
सभागृहात आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा; फडणवीस म्हणाले, आम्ही जबाबदारी घेऊ

पौर्णिमा हिने लोखंडी पाईपला साडी बांधली होती. साडीमध्ये बसून ती झोका खेळत होती. खेळता-खेळता अचानक तिची मान साडीमध्ये अडकून तिच्या गळ्याला फास लागला. तिने आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार घरच्यांच्या निदर्शनास आला. घरच्यांनी तत्काळ तिच्या मानेचा फास सोडवून तिला वडूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तडवळेसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com