धुळ्यामध्ये मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग; 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू
Team Lokshahi

धुळ्यामध्ये मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग; 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

मयत महिलांमध्ये एक अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याने त्या संदर्भातही पोलीस तपास करीत आहेत.
Published on

उमाकांत अहिरराव | धुळे : जिल्ह्यातील चिखलीपाडा गावामधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला भीषण आग लागल्याचे समजत असून यामध्ये चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. जखमींना तातडीन उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून तपास सुरु आहे.

धुळ्यामध्ये मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग; 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू
अंगणात झोपलेल्या महिलेला वाघाने उचललं अन्...

वाढदिवसानिमित्त वापरली जाणारी आकर्षक मेणबत्ती या कारखान्यामध्ये बनवली जात होती यादरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आणि या आगीत चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन गंभीर जखमी झाल्या आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. जखमींना नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मयत महिलांमध्ये एक अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याने त्या संदर्भातही पोलीस तपास करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com