धावत्या रेल्वेत गर्दुल्ल्याने अपंग व्यक्तीला जाळले; केईएममध्ये उपचार सुरू

धावत्या रेल्वेत गर्दुल्ल्याने अपंग व्यक्तीला जाळले; केईएममध्ये उपचार सुरू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वेत हा हल्ला झाला आहे.

मुंबई : धावत्या रेल्वेत नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने अपंगाला जाळल्याची घटना उघड झाली आहे. नशेसाठी वापरण्यात येणारे सोल्युशन त्याच्या हातावर टाकून पेटवून दिले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वेत हा हल्ला झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री १०:४५ ते ११ च्या सुमारास कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घटना घडली आहे. जखमी दिव्यांग प्रमोद वाडेकर (अंदाजे वय ३५) मुका आहे.

धावत्या रेल्वेत गर्दुल्ल्याने अपंग व्यक्तीला जाळले; केईएममध्ये उपचार सुरू
ठाकरे-भाजप एकत्र? 'त्या' बॅनरवरुन शिंदे गटाची उध्दव ठाकरेंवर टीका, तर चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण

आरोपी अपंग डब्यात बसला असतांना त्याचा आणि प्रमोद वाडेकर यांच्यामध्ये वाद झाला. त्यातून आरोपीने नशेसाठी वापरणारा द्रव्य पदार्थ दिव्यांग व्यक्तीच्या अंगावार फेकला आणि त्याला काडीपेटी लावून पेटवून दिले. यात वाडेकर यांचा डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसंच, या हल्ल्यात प्रवाशाच्या हाताला, मानेला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रवाशाला उपचाराकरीत कळव्याच्या छत्रपती रुग्णालयात नेले असता तेथे उपचार होणार नाही असं सांगण्यात आलं. तब्बल १२ तास प्रमोद वाडेकर यांना बेड मिळाला नाही. अखेर केईएममध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पळून गेलेल्या संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com