बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली; रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बोरिवलीत चार मजली इमारत कोसळली; रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबईत इमारत कोसळून दुर्घटना होण्याचे सत्र थांबण्याचे काही नाव घेत नाही

मुंबई : मुंबईत इमारत कोसळून दुर्घटना होण्याचे सत्र थांबण्याचे काही नाव घेत नाही. आज दुपारी साडेबारा वाजता बोरिवली येथील एक चार मजली इमारत कोसळली. ही माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी व पोलीस घटना स्थळावर दाखल झाले असून युध्दपातळीवर बचावकार्याचे काम सुरु आहे.

बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर येथील गीतांजली ही चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. इमारत कोसळण्याची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या चार गाड्या मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी व पोलीस घटना स्थळावर दाखल झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 12 ते 15 नागरिक अडकल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गीतांजली इमारत पालिकेने धोकादायक घोषित केल्याने यातील रहिवाशांना बाहेर काढले होते. तरीही काही जण या इमारतीत राहत होते. दहिहंडीला सुटी असल्याने इमारतीत काही जण होते. तर, याच इमारतीत एक पंजाबी कुटुंब राहत होते. या कुटुंबातील 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Lokshahi
www.lokshahi.com