डोंबिवलीत धक्कादायक घटना! भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

डोंबिवलीत धक्कादायक घटना! भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

ठाकुर्ली जवळील खाडी किनारी परिसरातील घटना; पोलीस तपास सुरू

सुरेश काटे | डोंबिवली : पोलीस असल्याचे सांगून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर पीडित अल्पवयीन तरुणी शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या मित्रासह डोंबिवली जवळ असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरण्यासाठी गेली होती, त्यावेळेस ही घटना घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींच्या शोधासाठी पाच पथके तयार केली आहेत

डोंबिवलीत धक्कादायक घटना! भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना, भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं

शुक्रवारी बारा वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन तरुणी आपल्या एका मित्रासोबत ठाकुर्ली स्टेशन जवळ असलेल्या खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. दोघे फिरत असताना दोन जण त्या ठिकाणी आले. दोघांनी तरुणी आणि तिच्या मित्राला पोलीस असल्याचे सांगितले. त्यांनी तुम्ही या ठिकाणी कशाला आलात? तुमच्याबद्दल तुमच्या पालकांना सांगितले जाणार, असे धमकावले. त्यापैकी एकाने पीडित तरुणीला काही अंतरावर घेऊन गेला. तर आमचे साहेब त्या ठिकाणी बसले आहे, तू चल त्यांच्याशी बोल, असे सांगत दुसरा आरोपी तरुणीच्या मित्राला घेऊन दुसरा स्टेशन परिसरात आला. यादरम्यान पहिल्या आरोपीने मुलीवर बलात्कार केला. नंतर दुसरा आरोपी मुलीच्या मित्राला सोडून त्या ठिकाणी आला आणि त्याने देखील मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार पीडित तरुणीने आपल्या नातेवाईकांना सांगितला.ृ

याप्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी पीडिता आधी डोंबिवली जीआरपीकडे गेला. मात्र, ही घटना विष्णू नगर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने पीडित तरुणीला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. विष्णुनगर पोलिसांनी रात्री बाराच्या सुमारास या प्रकरणात गुन्हा दाखल केला. सध्या विष्णूनगर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी पाच पथके तयार केली आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. पीडित तरुणी आता बारावीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनेमुळे डोंबिवली एकच खळबळ उडाली आली आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com