वाढदिवशीच झाला घात! कुलरचा शॉक बसून नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू

वाढदिवशीच झाला घात! कुलरचा शॉक बसून नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू

वाढदिवशीच कुलरचा शॉक बसून नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंगेश जोशी | जळगाव : वाढदिवशीच कुलरचा शॉक बसून नऊ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुक्ताईनगर शहरात ही घटना घडली. वैष्णवी चेतन सनांसे असे मृत बालिकेचे नाव आहे. सदर घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे वैष्णवीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबियांचे नियोजन सुरू होते. मात्र, त्याचवेळी वैष्णवीला कुलरचा जोरदार शॉक लागला. या घटनेनंतर वैष्णवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केले. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com