पुण्यात खासगी बसला भीषण अपघात; 12 प्रवासी जखमी

पुण्यात खासगी बसला भीषण अपघात; 12 प्रवासी जखमी

हायवेवरील बॅरिगेट्स तोडून बस सर्विस रोडवर पलटी झाली

पुणे : पुण्यातील बावधन येथे खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. हायवेवरील बॅरिगेट्स तोडून ही बस सर्विस रोडवर पलटी झाली. या बसमध्ये एकूण 36 प्रवासी प्रवास करत असल्याचे समजत आहे. यामध्ये बारा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात खासगी बसला भीषण अपघात; 12 प्रवासी जखमी
'करारा जवाब मिलेगा', मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी खेडमध्ये कदमांचे बॅनर चर्चेत

मुंबईवरून बेंगलोरच्या दिशेने खाजगी बस जात असताना चांदणी चौकच्या अलीकडे बावधन सीएनजी पेट्रोल पंपाच्या येथे आली असता बस बॅरिगेट्स तोडून सर्विस रोडवर पलटी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदर बसमध्ये एकूण 36 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यामध्ये 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सदर जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com