दहावीचा पहिलाच पेपर देऊन येणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

दहावीचा पहिलाच पेपर देऊन येणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

पंढरपूर तालुक्यात दोन अपघातात दोन शाळकरी मुलींचा मृत्यू
Published on

अभिराज उबाळे | पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात दोन अपघातात शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील करकम भागामध्ये या दोन्ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अक्षरा जमदाडे व राधा आवटे अशी मयत झालेल्या मुलींची नावे आहेत.

दहावीचा पहिलाच पेपर देऊन येणाऱ्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू
कसब्याने खोटेपणाला व भारतीय जनता पक्षाला नाकारले : सुप्रिया सुळे

पहिली घटना भोसे येथे घडली. देविदास जमदाडे यांची कन्या अक्षरा ही आज सकाळी शाळा सुटल्यानंतर शाळेतून आपल्या घरी जात असताना भोसे पाटी येथे अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला.

तर, दुसऱ्या घटनेत दहावीचा मराठीचा पेपर देऊन भावा सोबत घरी जाणाऱ्या राधा नवनाथ आवटे हिच्या गाडीवर झाड पडून तिचा जागीच मृत्यू झाला. बार्डी पाटी-करकंब येथेही दुर्दैवी घटना घडली. एकाच दिवशी परिसरातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com