अजित पवार-शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील भेटीनंतर चर्चेला उधाण

अजित पवार-शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील भेटीनंतर चर्चेला उधाण

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. शिवेंद्रसिंहराजे बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संकुलातील व्हीआयआयटीमध्ये हजर झाले आणि त्यांनी अजित पवार यांच्यासोबत पंधरा मिनिटे चर्चा केली.

या चर्चेवर माध्यमांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, फक्त मतदारसंघातील कामासाठी आलो होतो, त्यात वेगळे नव्हते असे सांगितले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापूर्वी नुकतीच पुणे-मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेतली होती. काही दिवसांमधील ही त्यांची तिसरी भेट आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com