अजित पवारांनी घेतले पुण्यातील गणपतींचे दर्शन; मंडळांना केले 'हे' आवाहन

अजित पवारांनी घेतले पुण्यातील गणपतींचे दर्शन; मंडळांना केले 'हे' आवाहन

गणेश मंडळांना अजित पवारांचे आवाहन

पुणे : गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पांना आज भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसोबत मंडळांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार आज पुण्यात असून मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले आहे. यावेळी ते बोलते होते.

अजित पवार म्हणाले की, ३१ तारखेला बाप्पा आपल्याकडे आले. आजपर्यंत सगळे कार्यक्रम चांगले पार पडले आहे. आज विसर्जन मिरवणूक निघत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष ती काढता आली नव्हती. परंतु, यंदा अतिशय आनंद-उत्साहाने हा उत्सव पार पडला आहे.

मंडईपासून मानाच्या पाच गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. सगळ्या गणेश भक्तांनी काळजी घ्यावी की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. पोलिस त्यांचे काम करतीलच पण गणेश मंडळांनी देखील काळजी घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, दोन वर्ष कोरोनाच्या सावटानंतर यंदा गणेश विसर्जन मोठ्या दिमाखात करण्यात येत आहे. ठिकठकाणी पारंपारीक पद्धतीने बाप्पाची मिरवणुक काढत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. विसर्जनाच्या दिवशी महत्त्वाच्या विसर्जन स्थळी पाहायला मिळेल. त्यामुळे होणाऱ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवाय या गर्दीवर करडी नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com