अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान

चित्रपट महामंडळाच्या 2017 ते 2022 पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक समिती जाहीर

सतेज औंधकर | कोल्हापूर : कार्यकारणीची मुदत संपून दीड वर्षाचा कालावधी उलटलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी बुधवारी 14 सप्टेंबर रोजी चित्रपट महामंडळाच्या 2017 ते 2022 पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक समिती जाहीर केली.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 20 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपट महामंडळाची निवडणूक होणार आहे तर 22 नोव्हेंबर 2022 रोजी कोल्हापुरात मतमोजणी होणार आहे. महामंडळाच्या निवडणुकीची अधिसूचना बुधवारी १४ सप्टेंबरपासून लागू झाले आहे असे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

निवडणूक समितीत पाच जणांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. प्रशांत जीवनराव पाटील कोल्हापूर यांच्यावर जबाबदारी सोपवले आहे. तर या समितीत निवडणूक अधिकारी म्हणून तर निवडणूक अधिकारी म्हणून प्रताप वसंतसिंग परदेशी पुणे, आकाराम पाटील कोल्हापूर, शहाजीराव पाटील पुणे आणि सुनील मांजरेकर मुंबई यांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी प्रशांत पाटील यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सभासदांची कच्ची मतदार यादी 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. कच्च्या मतदार यादीवर हरकती व दुरुस्ती स्विकारण्याचा कालावधी 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर आहे. सभासदांची पक्की मतदार यादी 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुर येथील कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल. अर्ज वाटपाचा कालावधी 13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोंबर असा आहे.

उमेदवारी अर्ज कोल्हापूर कार्यालय, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर शाखा येथे असणार आहे. उमेदवारी अर्ज स्विकारण्याचा कालावधी 17 ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर यादरम्यान आहे. उमेदवारी अर्जांची यादी 20 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी 27 ऑक्टोबरला तर पात्र उमेदवारांची यादी 29 सप्टेंबर रोजी कोल्हापूर कार्यालय येथे प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आहे. निवडणुकीस पात्र उमेदवारांची चिन्हासह अंतिम यादी 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होईल. 18 व 19 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर मतदान साहित्य पोहोच होईल. तर 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर नवी मुंबई या ठिकाणी मतदानाची सुविधा आहे आणि 22 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता कोल्हापूर येथे मतमोजणी होणार आहे. पत्रकार परिषदेला संजय ठुबे उपस्थित होते

Lokshahi
www.lokshahi.com