अमृता फडणवीसांना फेसबुकवरुन शिवीगाळ; ठाण्यातून घेतलं एकाला ताब्यात

अमृता फडणवीसांना फेसबुकवरुन शिवीगाळ; ठाण्यातून घेतलं एकाला ताब्यात

मुंबई सायबर पोलिसांनी ठाण्यातून महिलेला घेतलं ताब्यात

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फेसबुकवर शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका महिलेला अटक केली आहे. मुंबई सायबर पोलिसांनी ठाण्यातून महिलेला ताब्यात घेतलं आहे. स्मृती पांचाळ असे महिलेचे नाव आहे.

अमृता फडणवीस यांनी 7 सप्टेंबर रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवर एका महिलेने एकामागून एक चार अपमानास्पद पोस्ट टाकल्या होत्या. या पोस्ट्स अत्यंत आक्षेपार्ह भाषेत लिहीण्यात आल्या होत्या. यावेळी पोलिसांनी एका अज्ञात फेसबुक वापरकर्त्याविरुध्द आयपीसी कलम ४१९, ४६८, ४६९, ५०४, ५०५ (१)(सी), आणि ५०९ आणि कलम ६७, ६६(डी) नुसार गुन्हा दाखल केला.

स्मृती पांचाळ असे महिलेचे नाव असून या महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी गणेश कपूर नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केले होते. याचा वापर करून ती अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

स्मृती पांचाळ या महिलेला मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सोबत पोलिसांनी आरोपी महिलेचा मोबाईलही जप्त केला आहे. महिलेने याआधीही अनेकदा अशा पोस्ट केल्याची माहिती मिळत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com