भुसावळ एक्सप्रेस इगतपुरी ते पुणे दरम्यान एक महिन्यासाठी रद्द

भुसावळ एक्सप्रेस इगतपुरी ते पुणे दरम्यान एक महिन्यासाठी रद्द

भुसावळ-पुणे एक्सप्रेस एक महिन्यासाठी इगतपुरी ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे

मंगेश जोशी | भुसावळ : भुसावळ-पुणे एक्सप्रेस एक महिन्यासाठी इगतपुरी ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. 20 मे 2023 ते 19 जून 2023 या कालावधीसाठी इगतपुरी ते पुणे दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाने दिली आहे. यामुळे खान्देश व नाशिक कडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय होणार आहे.

तांत्रिक कारणास्तव इगतपुरी ते पुणे दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी ही गाडी 28 जानेवारी 2023 ते 1 एप्रिल 2023 या दोन महिन्याच्या कालावधीत कर्जत स्थानकावर यार्ड रिमोल्डिंगच्या कामामुळे ही गाडी भुसावळ ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता एक महिन्यासाठी इगतपुरी ते पुणे दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे. भुसावळ ते इगतपुरीपर्यंतच ही गाडी धावणार आहे. मात्र, यामुळे खान्देश व नाशिक कडून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय होणार असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनात सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाने केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com