धक्कादायक! सांगतलीत भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

धक्कादायक! सांगतलीत भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

जतमधील सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

संजय देसाई | सांगली : सांगलीच्या जतमध्ये भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विजय ताड असे भाजपा नगरसेवकाचे नाव आहे. ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढवला व ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. जतमधील सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! सांगतलीत भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या
न्यायालयाच्या ताशेऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांऐवजी मंत्र्यांचे सभागृहात उत्तर; अजित पवार संतापले, म्हणाले...

जत नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक विजय ताड यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून ताड यांची हत्या केली आहे. नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलजवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची इनोव्हा गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये विजय ताड जागीच ठार झाले आहेत.

या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. परंतु, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे मात्र समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच, ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे. तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com