Borivali Police
Borivali Police Team Lokshahi

वर्दीतील माणुसकी, कचराकुंडीत सापडलेल्या नवजात मुलीचे बोरिवली पोलीस करणार संगोपन

क्रूर अज्ञात पालकांविरुद्ध पोलिसांनी दाखल केला गुन्हा
Published by :
Sagar Pradhan

बोरिवलीमध्ये पोलिसांना कचराकुंडीत एक नवजात मुलगी आढळून आली होती. या सापडलेल्या मुलीचे संगोपन एमएचबी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी करणार आहेत. एमएचबी पोलीस ठाण्याची मुलगी असे या मुलीचे नाव ठेवण्यात येणार असून तिच्या शिक्षणासाठी पोलीस बँकेत पैसे जमा करणार आहेत. पोलिसांच्या या माणुसकीच्या दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी कौतुक केले आहे.

Borivali Police
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात एक दिवसीय दुखवटा जाहीर

बोरिवली येथील शिवाजीनगर, साईबाबा मंदिराजवळ एक कचराकुंडी आहे. दोन दिवसांपूर्वी तिथे एका बेकरी मालकाला एक नवजात बाळ सापडले होते.नागरिकांनी तिथे घडलेला प्रकार सांगून या मुलीचा ताबा पोलिसांना दिला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे बाळ काही तासापूर्वीच जन्म झाला असे निष्पन्न झाले आहे. तिचा जन्म लपविण्याच्या हा सर्व प्रकार पालकांनी केला असावा असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बाळाची नाळदेखील कापली गेले नव्हती.

या बाळाला पोलिसांनी तातडीने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिची विशेष काळजी घेण्याची विनंती पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांना केली आहे. तिची प्रकृती आता स्थिर आहे. या मुलीच्या संगोपणासाठी पोलिसांनी बालकल्याण समितीकडे पत्रव्यवहार केला आहे.

Borivali Police
राजकीय चर्चेचा वाद विकोपाला, एकाने फोडले दुसऱ्याचे डोके

बाळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाल कल्याण समितीसमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर या बाळाला अंधेरीतील एका खाजगी संस्थेत ठेवले जाणार आहे. त्या बाळाचे नाव एमएचबी पोलीस ठाणे असे केले जाणार असून तिच्या भविष्यासाठी तसेच शिक्षणासाठी पोलीस काही रक्कम जमा करणार आहे. ती रक्कम बँकेत बँकेत एफडी म्हणून ठेवली जाणार आहे. दरम्यान, त्या बाळाला सोडून पळून जाणाऱ्या क्रूर अज्ञात पालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com