Kalyan
Kalyan Team Lokshahi

राजकीय चर्चेचा वाद विकोपाला, एकाने फोडले दुसऱ्याचे डोके

हल्ला करणाऱ्या कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

अमजद खान। कल्याण: घरगुती भांड्यांच्या दुकानात देशातील राजकीय सद्य परिस्थितीवर चर्चा सुरु होती. ही चर्चा इतक्या विकोपाला गेली की, एका दुकानातील कामगाराने दुसऱ्या दुकानातील कामगाराला कुक्कर झाकण फेकून मारले. या घटनेत धीरज पांडे नावाचा कामगार जखमी झाला आहे. हल्ला करणारा दुसरा कामगार मनिष गुप्ता याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Kalyan
कुणीही कुणाच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जात नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

आज ठिकठिकाणी राज्यातील किंवा देशातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा सुरु असते. चर्चे दरम्यान तर्क विर्तक लावले जातात. मात्र सहनशीलता कमी होत चालली आहे. त्याचाच परिमाण असा होत आहे की, चर्चेमध्ये वाद होतो.

या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. कल्याण पश्चिमेतील बाजार पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भांडी विक्रीच्या बाजारपेठेत एका दुकानात राजकीय चर्चा सुरु होती. देशावर किती कर्ज आहे. बजेट काय मांडले आहे. नेमकी काय परिस्थिती आहे. ही चर्चा सुरु असताना धीरज पांडे नावाचा तरुण काही जणांसोबत चर्चा करीत होता. या चर्चेत शेजारच्या दुकानातील कामगार मनिष गुप्ता हा देखील सहभागी झाला होता. धीरजने जो मुद्दा चर्चेच्या दरम्यान उपस्थित केला. तो मनिषला पटला नाही. मनिषने थेट कूकरचे झाकण उचलून धीरजच्या डोक्यावर मारले. यात धीरज पांडे हे जखमी झाले.

त्यानंतर, बाजारपेठ पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मनिष गुप्ताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरण शिवसेनेचा महिला पदाधिकारी आशा रसाळ आणि राणी कपोते यानी पुढाकर घेत जख्मी धीरज याला हॉस्पिटल मध्ये उपचारा साठी दाखल केले त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी देखील पुढाकार घेतला.

Lokshahi
www.lokshahi.com