Crime
CrimeTeam Lokshahi

विरारमध्ये लग्न घरात चोरी; २५ तोळे सोन्यासह रोख रक्कम लंपास

विरार पश्चिमेच्या अर्नाळा परिसरात लग्न घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे

विरार : लग्न घरात चोरी झाल्याची धक्कायदायक घटना समोर आली आहे. चोरांनी २५ तोळे सोन्यासह रोख रक्कम लंपास केली आहे. विरार पश्चिमेच्या अर्नाळा परिसरातील लग्न घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Crime
आदित्य ठाकरे माझे मुलाच्या वयाचे...; गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

आशा भोईर यांच्या लहान मुलीचे 3 मे रोजी लग्न पार पडले. दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी सर्व कुटूंब परिवार विरार पश्चिमेच्या अर्नाळा येथील सोसायटी बस स्टॉप येथे मुलाच्या घरी गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्री 8:30 ते 10 च्या दरम्यान बाहेरील भिंतीवर चढून घरात प्रवेश केला. व कपाट उघडून सर्व सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लग्नात आलेले बंद पॉकेट व महत्वाचे कागदपत्रे घेऊन चोरटे फरार झाले आहेत. यामध्ये 25 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोख रक्कमेचा समावेश आहे.

याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. परिसरातील सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. परंतु, चोर घरातील आहेत की बाहेरचे आहेत. याची सखोल माहिती पोलीस तपासानंतर समोर येणार आहे. लग्न घरात चोरी झाल्याने संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली असून भोईर कुटूंबावर मोठ संकट आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com