'नवनीत राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहन करू'

'नवनीत राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यास आत्मदहन करू'

राणा दाम्पत्याच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा
Published on

सूरज दहाट | अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात राडा घातल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे यासाठी अमरावतीत भीम ब्रिगेड संघटना आक्रमक झालेली आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हे दाखल न झाल्यास 24 तारखेला नवनीत राणा यांच्या घरासमोर शेकडो कार्यकर्त्यांसह भीम बिग्रेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सहा दिवसापूर्वी राजापेठ पोलीस ठाण्यात राडा घातल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सगळ्या संघटना आक्रमक झाल्या आहे. नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी हुज्जत घातली तरी देखील पोलिसांनी नवनीत राणा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, तसेच नवनीत राणा अमरावती शहराचे नाव लव जिहाद वरून अमरावतीच नाव खराब करत आहे व हिंदू मुस्लिम दंगलीचं षडयंत्रच नवनीत राणा रचत असल्याचा खळबळजनक आरोपही भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे कडे यांनी केले.

दरम्यान, भीम बिग्रेडने आज अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेत कार्यालयासमोर अर्धनग्न ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणा विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, २४ तारखेपर्यंत नवनीत राणा विरोधात गुन्हे दाखल न झाल्यास २४ तारखेला राणा यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राजेश वानखडे यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एका 19 वर्षीय युवतीचे लव जिदाह वरून अपहरण झाले आहे. त्यामुळे तात्काळ त्या युवतीला पोलिसांनी शोधून आणावे यासाठी सात तारखेला नवनीत राणा यांनी राजापेठ ठाण्यात जाऊन पोलिसांना जवाब विचारतावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. व माझा कॉल का रेकॉर्ड केला म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबत नवनीत राना यांनी जोरदार शाब्दीक बाचाबाची केली. दरम्यान, काही तासातच तरुणी सुखरूपरीत्या सातारा येथे सापडली. त्यानंतर राजापेठ पोलीस ठाण्यात तरुणी आल्यानंतर तिने मला कोणीही पळवून नेलं नाही. मी स्वतः वरून घरून रागाने निघून गेली होती, असं बयान तिने पोलिसांना दिलं होतं. त्यामुळे नवनीत राणांनी केलेले आरोप पूर्ण खोटे ठरले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com