कोकणवासियांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वे २६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

कोकणवासियांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वे २६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

मुंबई : सुट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि या अतिरिक्त उन्हाळी विशेषसह या वर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची संख्या ९४२ होईल.

कोकणवासियांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वे २६ उन्हाळी विशेष गाड्या चालवणार
भिवंडीत दगड खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

01129 विशेष दि. ६.५.२०२३ ते ३.६.२०२३ पर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता पोहोचेल.

01130 विशेष दि. ७.५.२०२३ ते ४.६.२०२३ पर्यंत दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिवि येथून १६.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

संरचना : एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण : विशेष गाडी क्रमांक 01129/01130 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ४.५.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सूरु होईल.

तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com