उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; चंद्रकांत खैरेंच्या विश्वासू नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; चंद्रकांत खैरेंच्या विश्वासू नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

शिंदे सरकार स्थापन झाले असले तरी अदयापही शिवसेनेतून इनकमिंग सुरुच

औरंगाबाद : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात अभूतपूर्व सत्तांतर झाले. यावरुन मात्र शिंदे गटावर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यामध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव आघाडीवर आहे. अशातच मात्र खैरे यांचे विश्वासू नरेंद्र त्रिवेदी यांनीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

शिंदे सरकार स्थापन झाले असले तरी अदयापही शिवसेनेतून इनकमिंग सुरुच असून जिल्हा व स्थानिक पातळीवरुन मोठ्या प्रमाणात नेते शिंदे गटात सामील होत आहे. यामध्ये नरेंद्र त्रिवेदी यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिवेदी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद येथे बळ वाढले आहे.

कोण आहेत नरेंद्र त्रिपाठी?

नरेंद्र त्रिपाठी 20 वर्षांपासून औरंगाबाद जिल्हाप्रमुखांचे पद सांभाळत आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे ते अत्यंत जवळचे असून डावा हात असल्याची उपाधी नरेंद्र त्रिवेदींना होती. तर, त्यांच्यावर खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे यांचीही विशेष मर्जी होती.

Lokshahi
www.lokshahi.com