आंतरराष्ट्रीय चिखल गॅंगला पकडण्यात पुणे पोलिसांना यश

आंतरराष्ट्रीय चिखल गॅंगला पकडण्यात पुणे पोलिसांना यश

शहरात घरफोड्या करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय चिखल गॅंगला पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे

चंद्रशेखर भांगे | पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय चिखल गॅंगला पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अंगाला चिखल लावून अनेक उचभ्रु सोसायटीत भिंतीवर चढून घरफोड्या केल्या आहेत. आरोपीकडून चतुःश्रुंगी पोलिसांनी पाच लाख 74 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चिखल टोळीचा प्रमुख सुरेश गुमानसिंग मावी, प्यारसिंग बुल्ला अलावा, बियाण सिंग उर्फ भाया ठाकूर सिंग भुढड, महेंद्रसिंग कलम सिंग डावर, महेंद्रसिंग धनसिंग अजगर,आणि कल्लू मुकुंन देवका अशी अटक केलेली आंतरराष्ट्रीय टोळीच्या आरोपींची नावे आहेत. ही टोळी शहरातील औंध बाणेर परिसरात नदीपात्रातून जवळ असलेल्या सोसायटीत अंगाला चिखल लावून रात्रीच्या वेळी घुसून चोरी करत होते. चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार महाडिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महाडिक आणि चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पुण्यातील स्मशानभुमीजवळ छापेमारी करून या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, पुढील तपास चतुःश्रुंगी पोलीस करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com