काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांना 2 तास उन्हात केले उभे!

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांना 2 तास उन्हात केले उभे!

आज कॉग्रेसच्या वतीने महागाई, बेरोजगार, अग्निपथ योजना, व जीवनावशक्य वस्तू वरील लावलेल्या जी ऐस टी च्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

अमोल नांदूरकर | अकोला : आज कॉग्रेसच्या वतीने महागाई, बेरोजगार, अग्निपथ योजना, व जीवनावशक्य वस्तू वरील लावलेल्या जी ऐस टी च्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आकोला शहरात देखील प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशा नुसार आज दुपारच्या सुमारास आंदोलन करण्यात आले पण काँगेसच्या नियोजन शून्य कारभारामुळे अकोला फोटोग्राफर तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने या आंदोलनावर बहिष्कार टाकला.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांना 2 तास उन्हात केले उभे!
राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

अकोला शहरातील कोग्रेस पक्षाचा कारभार रामभरोसे चालत असून ऐक ना धड भाराभर चीद्या या म्हणीची प्रचिती आज अकोला शहरात पाहवयास मिळाली आज देशभरात काँग्रेस च्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत अकोल्यातही महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरनार असून अकोला शहरातील धिंग्रा चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समस्त मिडीयाला काल सोशल मीडिया वर देण्यात आली असून या आंदोलनाची वेळ दुपारी ३ वाजता ठेवण्यात आली होती पण काहीच वेळात ह्या आंदोलनाची वेळ बदलण्यात आली आणि वेळ २:३० चा ठेवण्यात आला.

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांना 2 तास उन्हात केले उभे!
कल्याणमधील देशमुख होमचा पाणी प्रश्न पेटणार!

अकोल्यात सर्वच पत्रकार वेळेवर पोहोचले पण काँग्रेसचे आंदोलने करते पदाधिकारी कोणीच आंदोलन स्थळी हजर नव्हते दोन तास वाट पहिल्या नंतर देखील कोणीच आंदोलन स्थळी हजर न झाल्याने व प्रसारमाध्यमांना नाहक ताटकाळत ठेवल्याने अकोला शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच फोटोग्राफर असोसिएशन ने निषेध केला असून ह्या आंदोलनाला कव्हरेज दिले नाही. अकोला शहरातील काँग्रेस पक्षते कार्य पाहता यांच्यातच ऐकी दिसून न आल्याने अकोला शहरात येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकी नंतर खरच काँग्रेस पक्ष शहराकडे लक्ष देतील हे शक्य वाटत नाही.

Lokshahi
www.lokshahi.com