Crime
CrimeTeam Lokshahi

हॉकी खेळण्याचा वादातून चौघांचा मित्राच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला

पुण्यातील वारजे भागातून धक्कादायक घटना समोर

अमोल धर्माधिकारी | पुणे : हॉकी खेळण्याचा वादातून चार जणांनी मित्राच्या आई आणि त्याच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला केला आहे. पुण्यातील वारजे भागातून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. चार जणांनी तीन अल्पवयीन मुलींना लोखंडी रॉड, पाईपने मारहाण केली. या हल्ल्यात मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. कृष्णा सहानी यांनी या संदर्भात तक्रार दिली असता याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे.

Crime
...तर रस्त्यावर उतरून तुमचं स्वागत स्वतः करेल; धनंजय मुंडेंचं पंकजांना चॅलेंज

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास वारजेतील दांगट वस्तीजवळ घडली. फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांना ओळखतात. या दोघांमध्ये मैदानावर हॉकी खेळावरून काही वाद झाले होते. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी कृष्णा याला मारण्यासाठी थेट घरात प्रवेश केला.

यावेळी आरोपींना कृष्णा दिसला नाही. त्यामुळे त्यांनी घरातील उपस्थित असलेल्या महिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात कृष्णा यांची आई तसेच तीन लहान बहिणी यांच्यावर रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या लहान मुलींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून यातील दोन जणींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वारजे पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com