Video : आधी चपलेन मारलं, मग काठी तुटेपर्यंत बदडलं; महिलेचा रुद्रावतार

Video : आधी चपलेन मारलं, मग काठी तुटेपर्यंत बदडलं; महिलेचा रुद्रावतार

दारूच्या नशेत महिलेशी अश्लील संभाषण करण एका मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे

अनिल ठाकरे | चंद्रपूर : दारूच्या नशेत महिलेशी अश्लील संभाषण करण एका मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे. या महिलेने पायातील चपलेने मुख्याध्यापकाचा पानउतारा केला. या घटनेचा आता व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात ही घटना घडली आहे.

दारूच्या नशेत महिलेशी अश्लील संभाषण एका मुख्याध्यापकाने केले. यानंतर मुख्याध्यापक दिसताच महिलेचा संताप अनावर झाला. व आधी या महिलेने पायातील चपलेने मुख्याध्यापकाचा पानउतारा केला. त्यानंतर हातात काठी घेऊन काठी तुटेपर्यंत मारले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हा मुख्याध्यापक कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. या मुख्याध्यापकाचा कार्यकाळ वादग्रस्त असल्याचेही बोललं जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com