Ajit Pawar
Ajit PawarTeam Lokshahi

अजितदादांच्या इशाऱ्यानंतरही बारामतीत कोयता हातात घेऊन धमकावण्याचा प्रयत्न?

पोलिसांकडून अद्यापही कारवाई न करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय केला जातोय व्यक्त
Published on

विकास कोकरे | बारामती : पुणे शहरात कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत माजवणाऱ्या ‘कोयता गँग’ने गेले काही दिवस उच्छाद मांडला आहे. बारामतीत देखील कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोयता गॅंगला इशाराही दिला होता. परंतु, त्यानंतरही कोयता घेऊन बारामतीत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला आहे.

Ajit Pawar
सी व्होटर कंपनी महाविकास आघाडीने तयार केली : रवी राणा

मध्यतंरी, बारामतीत देखील टोळक्याने कोयता हातात घेऊन हॉटेल आणि दुकानांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अजित पवारांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कोयता गँगवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यापुढे बारामतीत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही दिला होता. मात्र, अजितदादांच्या या इशाऱ्यानंतरही बारामती शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या एका सुप्रसिद्ध हॉटेल बाहेरील एका पान टपरीवाल्याला हातात कोयता घेऊन दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला असून शिवीगाळ केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बारामतीत आम्हीच गुन्हेगारी सुरु केली म्हणत पोलीसही आम्हाला काय करू शकत नाही, असे त्याने म्हंटले आहे. त्यामुळे घाबरलेल्या त्या व्यक्तीने तात्काळ हाकेच्याच अंतरावर असलेले शहर पोलीस स्टेशन गाठलं व त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र, पोलिसांकडून देखील अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com