राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

कल्याण-राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित रोकडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

अमझद खान | कल्याण : कल्याण-राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित रोकडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. रोकडे यांच्या नियुक्तीला एक वर्ष उलटून गेले. दरम्यान त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पक्षातील काही मंडळी रोकडे यांना पदावरुन हटविण्यासाठी कोकण विभागीय अध्यक्षांवर दबाव आणत होते.

राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
कल्याणमधील देशमुख होमचा पाणी प्रश्न पेटणार!

पक्षाच्या परिसंवाद यात्रेत रोकडे यांनी केलेला प्रचार प्रसार हा काही मंडळींना रूचला नाही. रोकडे यांना पदावर हटविण्यासाठीच्या हालचाली करुन ही मंडळी थांबली नाहीत. तर रोकडे हे महापालिकेत काही विकास कामांचा ठेका घेतात. तसेच सिव्हील वर्कची कामे करतात. ही कामे रोकडे यांना मिळू नयेत यासाठी या मंडळींनी प्रयत्न केले. हा सगळा प्रकार राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या कानावर टाकला. त्यांनीही माङया प्रकरणात लक्ष घालून पक्षातील पदाधिका:यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. या सगळया राजकारणाचा वीट आल्याने रोकडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. रोकडे यांनी ज्या मंडळींकडून खरोखरच त्यांना त्रस आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी राजीनामा पत्रत केलेला नाही. सुजीत रोकड़े हैं शिंदे गटात सामील होणार असे त्यांनी सांगितले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com