बारावीनंतर आता दहावीच्या पेपरमध्ये घोळ! मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रथम भाषेचा दिला पेपर

बारावीनंतर आता दहावीच्या पेपरमध्ये घोळ! मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रथम भाषेचा दिला पेपर

बारावीच्या सध्या परीक्षा सुरु असून पहिल्या दिवसांपासूनच पेपरमध्ये घोळ होत आहे. आता असाच प्रकार दहावीच्या परीक्षांमध्येही झाला आहे

बालाजी सुरवसे | धाराशिव : बारावीच्या सध्या परीक्षा सुरु असून पहिल्या दिवसांपासूनच पेपरमध्ये घोळ होत आहे. आता असाच प्रकार दहावीच्या परीक्षांमध्येही झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात मराठी माध्यमाचा विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रथम भाषेचा विषयाचा पेपर देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना आता निकालाची चिंता लागली आहे.

बारावीनंतर आता दहावीच्या पेपरमध्ये घोळ! मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी प्रथम भाषेचा दिला पेपर
औरंगजेबासोबत आमचा काही संबंध नाही, कबर हलवायची असेल तर... : इम्तियाज जलील

धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूल येथे दहावी परीक्षेचे केंद्र आहे. येथील एका हॉलमध्ये 25 विद्यार्थ्यांना इंग्रजीचा पेपर सोडवण्यासाठी देण्यात आला होता. वास्तविक पाहता या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमानुसार इंग्रजी पेपर देणे आवश्यक होते. या विद्यार्थ्यांना 875 कोड क्रमांकचा पेपर देण्याचे बोर्डाचे निर्देश असतानाही 784 कोड क्रमांकाचा पेपर देण्यात आला. पहिल्याच मिनिटाला हा प्रकार विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिला. मात्र, पर्यवेक्षकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. यामुळे 25 विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आपल्या भवितव्याचे काय होणार? असा प्रश्न पडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com