Crime
CrimeTeam Lokshahi

धक्कादायक! ग्रामसेवकाला डांबून भीती दाखवत उकळले ७३ हजारांची खंडणी

पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या कुडजे गावातील धक्कादायक घटना

अमोल धर्माधिकारी | पुणे : ग्रामसेवकाला डांबून ठेवून विषारी औषध पाजण्याची भीती दाखवून ७३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या कुडजे गावातील धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामसेवक महेशकुमार खाडे असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. खाडे यांच्या फिर्यादीवरून विकास प्रकाश गायकवाड व त्याच्या इतर दोन साथीदारांच्या विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
बारसू रिफायनरी आंदोलन चिघळले! आंदोलक आक्रमक, पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

ग्रामसेवक खाडे हे कार्यालयीन कामकाज आवरुन काल सायंकाळी घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी कुडजे गावच्या स्मशानभूमीजवळ खाडे आले असता आरोपींनी त्यांची गाडी आडवली आणि जबरदस्तीने बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलवर नेले व त्यांचे हातपाय बांधले.

त्यानंतर एक औषधाची बाटली दाखवत 'आत्ताच्या आत्ता पैसे दे नाहीतर तुला हे औषध पाजून मारून टाकू' अशी धमकी दिली. खाडे यांनी स्वतःच्या खात्यात असलेले ४९ हजार रुपये व आपल्या मित्राकडून आणखी २४ हजार मागून एकूण ७३ हजार रुपये आरोपींना दिले. उद्या आणखी दीड लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू' अशी धमकी दिली.

याविरोधात खाडे यांनी विकास प्रकाश गायकवाड व त्याच्या इतर दोन साथीदारांच्या विरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्य आरोपी सध्या फरार असून इतर दोन आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com