एसटी बसचा लातूरमध्ये भीषण अपघात, 42 प्रवासी जखमी

एसटी बसचा लातूरमध्ये भीषण अपघात, 42 प्रवासी जखमी

लातूरहून पुणे-वल्लभनगरकडे एसटी महामंडळाची बस रवाना झाली होती.

लातूर : एसटी महामंडळाच्या बसला लातूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 42 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

लातूरहून पुणे-वल्लभनगरकडे एसटी महामंडळाची बस रवाना झाली होती. यादरम्यान एसटी बसचा रॉड तुटल्याने बस पुलावरून खाली घसरल्याची घटना घडली आहे. मुरूड जवळील बोरगाव काळे येथील पुलावर ही घटना घडली आहे. याची माहिती समजताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. व लातूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com