Ambernath Robbery
Ambernath RobberyTeam Lokshahi

वेबसिरीजच्या नावाखाली पॉर्न चित्रपटाचे चित्रीकरण? एकाला अटक

स्ट्रगलर महिला कलाकाराच्या तक्रारीवरून चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रिध्देश हातीम | मुंबई : मुंबईच्या चारकोप भागात बिल्डींगच्या फ्लॅटमध्ये पॉर्न चित्रपट बनवणाऱ्या टोळीचा कारनामा समोर आला आहे. परदेशी वेब सिरीज बनवण्याच्या नावाखाली स्ट्रगलर स्री कलाकारांला काम देण्याच्या नावाखाली पॉर्न चित्रपटात काम करण्यास सांगितले. यामुळे या स्त्री कलाकाराने संबंधित चार जणांविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी एक आरोपीला अटक केली तसेच इतर तीन जणांचा शोध पोलीस घेत आहेत.

एक स्ट्रगलर महिला चित्रपटात काम शोधत होती. त्यावेळी तिचा संपर्क चित्रपट बनवणाऱ्या टोळीशी आला असता त्यांनी तिला विदेशी कंपनीसाठी बोल्ड वेब सिरीज काम करावे लागेल, अशी विचारणा केली. यावेळी पॉर्न चित्रपट बनवून तो इंटरनेटवर अपलोड करण्यात आला. ही बाब संबंधित महिलेच्या लक्षात येताच तिने या चार जणांविरोधात चारकोप पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. तिच्या या तक्रारीवरून पोलिसांनी यातील एक आरोपीला अटक केली असून बाकी तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com