आवडत्या शिक्षकाला राजापूरच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी दिला अनोखा निरोप

आवडत्या शिक्षकाला राजापूरच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी दिला अनोखा निरोप

शिक्षक-विद्यार्थ्यांचे नाते दर्शवणारा निरोप समारंभ राजापूर येथील शाळेने दिला

राजापूर : व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये गुरूची भूमिका महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे, आदर्श विद्यार्थी घडवणे यासाठी शिक्षक अथक प्रयत्न करत असतात. काही शिक्षक विद्यार्थ्यांचे लाडके असतात. त्या शिक्षकाचे आणि विद्यार्थ्यांचे नाते अतिशय सुंदर असते. असाच एक शिक्षक-विद्यार्थ्यांचे नाते दर्शवणारा निरोप समारंभ राजापूर येथील शाळेने दिला आहे.

राजापूर तालुक्यातील तुळसवडे गावातील श्री सद्गुरू गगनगिरी स्वामी विद्यालयातील सहशिक्षक सुभाष कुंभार आणि शालेय सेवक विश्राम आडीवरेकर यांचा निरोप समारंभ करण्यात आला. माजी विदयार्थी मिनेश आडिवरेकर आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने एका आगळ्या-वेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी श्री गणेशची मूर्ती भेटवस्तू देवून भावी आयुष्यासाठी सुभाष कुंभार आणि विश्राम आडीवरेकर शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व आजी-माजी विदयार्थी, पालक आणि परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com