gautami patil thali
gautami patil thaliTeam Lokshahi

जबरा फॅन! चाहत्याने तयार केली गौतमी पाटील थाळी

महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली

सोलापूर : आपल्या वादग्रस्त नृत्यामुळे महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेली गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलीय. माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात एका हॉटेल चालकाने चक्क गौतमी पाटील थाळी सुरू केलीय. या हॉटेलचे उद्घाटन देखील गौतमी पाटील हिच्या हस्ते करण्यात आलं.

या हॉटेलचे मालक महेश गोरे हे गौतमी पाटील चे मोठे फॅन आहेत. त्यांनी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल सुमन चे उद्घाटन गौतमीच्या हस्ते केलं. आपल्या हॉटेलचे मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी चक्क गौतमी पाटील थाळीत सुरू केलीय.

या शाकाहारी स्पेशल थाळीमध्ये 240 रुपयात भेंडी फ्राय मिक्स व्हेज ग्रीन सलाड, स्पेशल डाळ फ्राय, चार बटर रोटी आणि गुलाबजाम असे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. उद्घाटनाच्या अल्पावधीतच गौतमी पाटील या नावाच्या क्रेजमुळे हे हॉटेल चर्चेत आलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com