Gautami Patil
Gautami Patil Team Lokshahi

'त्या' व्हायरल व्हिडिओवर गौतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, आज तुमच्यासमोर...

महिला आयोग माझ्यासोबत आहे त्याबद्दल बरं वाटलं. असं गौतमी पाटील म्हणाली.

नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या डान्समूळे कायम चर्चेत असते. आधीच आपल्या डान्सने चर्चेत असलेली गौतमी पाटील मागील आठवड्यात चांगलीच अडचणीत आली होती. एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत असताना अज्ञाताकडून लपून व्हिडीओ काढण्यात आला. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आला होता. या घटनेचा त्यावेळी तिच्या चाहत्यांकडून प्रचंड निषेध नोंदवला जात होता. सोबतच या गोष्टीवर सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया उमटत होते. आता याच घडलेल्या प्रकरणावर गौतमी पाटीलने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

https://www.lokshahi.com/ampstories/photo%20gallery/dancer-gautami-patil-dirty-video-viral

काय म्हणाली गौतमी पाटील?

आज नाशिक येथे गौतमी पाटील कार्यक्रमासाठी आली होती. त्यावेळी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांकडून त्या व्हिडिओबाबत तिला विचारण्यात आले तेव्हा त्यावर बोलताना तिने बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, “माझी बोलण्याची मनस्थिती नाहीय. पण तरीही मी आज तुमच्यासमोर आलीय”, असं म्हणत तिने एका वाक्यात गौतमीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकरावर प्रतिक्रिया दिली. आपल्यासोबत घडलेला प्रकाराबाबत ती उघडपणे बोलू शकत नाहीये. पण परिस्थितीशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.

पुढे ती म्हणाली की, “लोकं आपल्यासोबत आहेत या गोष्टीचं अभिमान वाटतोय. आपल्याला त्यांची साथ आहे, या गोष्टीचं खूप छान वाटतंय”, असे ती म्हणाली. तिला पोलीस कारवाईबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, पोलीस तपास करत आहेत. आरोपींवर कारवाई होईल, असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.

Gautami Patil
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची तोफ आज खेडमध्ये धडाडणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com