युवकाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

युवकाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

घराजवळच्या एका तरूणाकडून वारंवार त्रास होत असल्याच्या कारणावरून तरूणीनं ओढणीनं गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

सतेज औंधकर | कोल्हापूर : घराजवळच्या एका तरूणाकडून वारंवार त्रास होत असल्याच्या कारणावरून तरूणीनं ओढणीनं गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरूणीनं, चिठ्ठी लिहून आपल्या आत्महत्येला मारूती हरी बोडेकर जबाबदार असल्याचं नमुद केलंय. नकुशा बोडेकर (वय १९) असे त्या तरुणीचे नाव आहे.

युवकाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरात मनसेचा मोर्चा पोलिसांनी अडवला, आंदोलकांची धरपकड

कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरातील नकुशा बोडेकरनं आज आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वी ती आपल्या सावत्र आईकडून स्वतःच्या घरात रहायला आली होती. मात्र सावत्र आईच्या घराजवळ म्हणजे गगनगिरी पार्क परिसरात राहणार्‍या मारूती हरी बोडेकरनं, नकुशाला धमकी दिली होती. मारूतीकडून नकुशाला गेल्या काही दिवसापासून वारंवार त्रास दिला जात होता. अशातच तिनं घर सोडल्यानं, मारूतीनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

गरीब घरातील नकुशानं आज ओढणीनं गळफास लावून घेवून आत्महत्या केली. त्यापूर्वी तिनं चिठ्ठी लिहून मारूती बोडेकरकडून होणार्‍या त्रासाचा उल्लेख केला आहे. आपल्या आत्महत्येला मारूती बोडेकर जबाबदार असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी, असा उल्लेखही नकुशाच्या चिठ्ठीमध्ये आहे. त्यामुळं पोलिसांनी मारूती बोडेकरचा शोध सुरू केलाय. या घटनेमुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होतीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com