राज्यपाल पुन्हा वादात? राजभवनात मॉडेलचे फोटोशूट
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असल्याचे दिसत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आजही दिसून येत आहे. हा वाद संपत नाही तर राज्यपाल कोश्यारी पुन्हा वादात सापडले आहे. यावेळी राज्यपाल वादात सापडले त्याचे कारण ठरली एक मॉडेल.
राजभवनात एका मॉडेलने फोटो शूट केल्याचे आता समोर आले आहे. मायरा मिश्रा असे या मॉडेलचे नाव असून ती अभिनेत्री देखील आहे. राजभवनात तिने कोश्यारी यांच्यासह खुर्चीसोबत तसंच राजभवनात इतर ठिकाणी फोटो काढले. तिने सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले आहेत. आता यासाठी मॉडेलकडून खास फोटो शूट करण्यात आले की, राज्यपाल भेटीच्या प्रतीक्षेदरम्यान हे फोटो काढण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, त्यामुळे राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.