Crime
CrimeTeam Lokshahi

स्वतःला मूल बाळ नसल्याने रागात त्याने इमारतीमधील मुलांना फेकले खाली

मुंब्रामधील श्रीलंका परिसरातील धक्कादायक घटना

शुभम कोळी | मुंबई : आपल्याला मूलबाळ नाही या रागातून एका विकृत व्यक्तीने आपल्याच इमारतीत राहणाऱ्या दोन चिमुकल्यांना दुसऱ्या माळ्यावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 तारखेला मुंब्रा येथील श्रीलंका परिसरातील माऊंट व्हिव सोसायटीत ही घटना घडली होती.

मोहम्मद जोहान (वय 4) आणि जैनब अंसारी (वय 5) अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेत मोहम्मदचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जैनब गंभीर जखमी आहे. तिच्यावर मुंब्रा येथील बिलाल रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आसिफ असे या विकृत आरोपीचे नाव आहे.

Crime
'त्या' विधानावरुन मुख्यमंत्र्यांविरोधातच विधानपरिषदेत ठाकरे गटाची हक्कभंगाची नोटीस

आसिफ हा फटाक्यांचा व्यवसाय करतो. दिवाळीत तो इमारतीत राहणाऱ्या मुलांना फटाके आणून वाटत असे म्हणून त्याला सर्व मुलांनी फटाकेवाले अंकल नाव ठेवले होते. परंतु, त्याला मूलबाळ नसल्याने लहान मुलांना त्याच्या जवळ जाण्यास इमारतीतील सर्वांनी नकार दिला होता. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की आसिफ हा लहान मुलांचा खूप राग राग करत असे आणि मुलांना मारत असे. त्यातच इमारतीत काही जणांसोबत त्याचा वाद देखील झाला होता. तोच राग मनात धरत आसिफने चिमुकल्यांना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून खाली फेकून दिल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, मयत चिमुकल्यांच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात मुलाची पार्थिव ठेऊन ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी आसिफला अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com