कांदिवलीत अचानक कोसळलं घर, एकाच कुटूंबातील तिघे जखमी तर एकाचा मृत्यू

कांदिवलीत अचानक कोसळलं घर, एकाच कुटूंबातील तिघे जखमी तर एकाचा मृत्यू

मुंबईच्या कांदिवली (Kandivali) परिसरात अचानक घर कोसळल्याची (House Collapse) घटना घडली आहे. या घटनेच एकाच कुटूंबातील तीन जण जखमी झाले असून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तसेच पोलीस, अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारा हटवण्याचे काम सूरू आहे.

कांदिवली (Kandivali) पश्चिम इस्लाम कंपाऊंड येथे जेसीबी मशिनच्या सहाय्याने गटार तयार करण्यासाठी खोदकाम सुरू होते. त्यादरम्यान ग्राउंड प्लस 1 घर अचानक (House Collapse) कोसळले. यामध्ये एकाच कुटुंबातील तीघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिला आणि एक लहान मुलांचा समावेश आहे. तर एका चिमुकल्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. उर्वरित तीन जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलीस, अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम करत आहेत.कांदिवली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com