नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा; पुढील चार दिवस तापमानात मोठी घट

नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा; पुढील चार दिवस तापमानात मोठी घट

राज्यात उष्णतेची लाट आलेली असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच, हवामान विभागाकडून नागरिकांना गुडन्यूज देण्यात आली आहे.

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यात उष्णतेची लाट आलेली असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच, हवामान विभागाकडून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे. उद्यापासून उकाड्यापासून सुटका होणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. पुढील ४ दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार आहे.

नागरिकांना उकाड्यापासून मिळणार दिलासा; पुढील चार दिवस तापमानात मोठी घट
संजय राऊत स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हता म्हणून...; शिरसाटांचा चिमटा

संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढील ४ दिवस घट होणार असून उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तर, दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसात राज्याच्या अनेक भागात तापमान ४० अंशाच्या वर जात आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात ४० अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत. तर, चंद्रपूरात विक्रमी तापमानाची नोंद होत होती. ४० अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये, असे देखील आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com