काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर
गजानन वाणी|हिंगोली: खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अवघ्या तीन दिवसावर येऊन ठेपली असताना स्थानिक गटबाजी ही शिखरावर आहे दिवंगत खा. राजीव सातव यांच्या समर्थकांना ताकद देण्यासाठी पक्षाकडून माजी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांची एन्ट्री झाल्याचे बोलल्या जात असले तरी सातव समर्थकांची हेळसांड सुरूच आहे.
हिंगोली जिल्ह्यात खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी काही दिवसापासून करण्यात येत असून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर सक्रिय झाले आहेत खा. राजीव सातव यांच्या समर्थकांची ऐनवेळी पदे काढून घेण्यात आली यामध्ये हिंगोली व सेनगाव तालुका शहराध्यक्ष बदलले गेले यामुळे पुन्हा सातव गटात नाराजीचा सुरू उमटला यावर उपाय म्हणून पक्ष श्रेष्ठींनी माजी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविले आहे
माजी मंत्री वर्षाताई गायकवाड जिल्ह्यात दाखल होतच त्यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू केले आहेत हिंगोली बाजार पेठ फिरून त्यांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या मात्र याकडे जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी पाठ फिरवली सोमवारी वर्षाताईंनी सेनगाव सह जवळाबाजार येथे व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या मात्र या कडेही स्थानिक बड्या नेत्यांनी पाठ फिरवली
दरम्यान माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सोमवारीच स्वतंत्रपणे हिंगोली ते सेनगाव मोटरसायकल रॅली काढून काढली होती यामध्ये सातव गटाचे कार्यकर्ते व वर्षाताई गायकवाड यांना डावलण्यात आले होते
भारत जोडो यात्रेचा काँग्रेस पक्षाला देशभरातून फायदा होत असला तरी हिंगोली जिल्ह्यात मात्र सातव गोरेगावकर समर्थांच्या गटबाजीमुळे जिल्ह्यात यात्रेला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चर्चा आहे दरम्यान भारत जोडो यात्रे निमित्त खा. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी दोन्ही गटाकडून स्वतंत्र पोस्टर बाजी करण्यात आल्याने सातव व गोरेगावकर समर्थकांची गटबाची चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे शिवाय गटबाजीत आता काय राजकीय घडामोडी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे