महाराष्ट्र
कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार! अचानक 12 गायींचा मृत्यु
याठिकाणी गायींची गोशाळा देखील आहे; गंभीर गाईंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूरमध्ये अचानक 12 गायींच्या मृत्यूचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथे हा प्रकार घडला आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या सोहळ्यादरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेने कणेरी मठावर खळबळ उडाली आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या चार दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, याठिकाणी असलेल्या गोशाळेतील गायींना शिळे अन्न खाण्यात आल्याने या घटनेत 12 गायी दगावल्या आहेत. याठिकाणी गायींची गोशाळा देखील आहे. शिळे अन्न खाल्ल्याने गायींचा मृत्यू झाल्याची इथे चर्चा आहे. सध्या गंभीर गाईंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.