'लोकशाही मराठी'चा 20 एप्रिलला 'लोकशाही संवाद 2023'; दिग्गज नेत्यांची हजेरी

'लोकशाही मराठी'चा 20 एप्रिलला 'लोकशाही संवाद 2023'; दिग्गज नेत्यांची हजेरी

विविध सामाजिक, राजकीय नेते लोकशाही संवाद 2023 च्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2023' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. दिवसभर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय खास आकर्षण म्हणून आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची टीमही उपस्थित राहणार आहे.

'लोकशाही संवाद 2023' या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण तुम्ही 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लोकशाही न्यूज चॅनलसोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पाहु शकता. लोकशाही युट्युब चॅनेलवर हा कार्यक्रम दिवसभर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.

Follow us on :

Website: https://www.lokshahi.com/

Google News : https://www.lokshahi.com/

Facebook: https://www.facebook.com/LokshahiMarathi/

Instagram: https://www.instagram.com/lokshahimarathi/

Twitter : https://twitter.com/LokshahiMarathi

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com