धर्माधिकारींना कोणत्या निकषाखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार? RTI मध्ये महत्वपूर्ण खुलासा

धर्माधिकारींना कोणत्या निकषाखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार? RTI मध्ये महत्वपूर्ण खुलासा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

बारामती : ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना कोणत्या निकषाखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावर महत्वपूर्ण खुलासा समोर आला आहे. राज्य सरकारकडून साल २०१२ च्या निकषाखालीच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतची विचारणा बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी सरकारला माहिती अधिकारात केली होती.

धर्माधिकारींना कोणत्या निकषाखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार? RTI मध्ये महत्वपूर्ण खुलासा
गणेशोत्सवात रेल्वे बुकिंगचा घोळ; नारायण राणे घेणार केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक

त्यावर राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मला १२ मे २०२३ च्या पत्रानुसार महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी राज्य सरकारची १ सप्टेंबर २०१२ ची सुधारीत नियमावली शासन निर्णय दिला आहे. २०१२ च्या निकषाखाली धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे. त्यामुळे १० वर्षे निकषात कोणताही बदल न करता महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घाई करणाऱ्या या सरकारला नेमके मताचा टक्का वाढवण्यासाठी नावालाच धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा होता का? असा सवाल यादव यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोहळ्यासाठी लाखो श्री सदस्य सहभागी झाले होते. परंतु, या सोहळ्यात उष्माघात झाल्याने तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com